लॉकडाउन ३ नंतर पुढे काय करणार..?

राष्ट्रीय

सोनिया गांधीनी विचारला सरकारला सवाल

दिल्ली:- लॉकडाउन ३ चा कालावाधी १७ मे ला संपल्यानंतर केंद्र सरकार पुढे काय करणार आहे असा सवाल कोंग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांनी विचारला आहे. ₹काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सुद्धा सहभागी झाले. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे त्यानंतर मोदी सरकारचं कोरोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला आहे.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सगळ्या दिवसांमध्ये काँग्रेस शासित राज्यांची स्थिती नेमकी काय आहे? तिथे कोरोनाचे रुग्ण किती आहेत? काय काय उपाय योजण्यात आले आहेत याबाबत आज सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाउननंतर म्हणजेच १७ मे नंतर काय करणार मोदी सरकार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *