भीमा कोरेगाव प्रकरण :आनंद तेलतुंबडे यांच्या कोठडित २२ मे पर्यंत वाढ

क्राइम राज्य राष्ट्रीय

मुंबई, दिनांक १० मे

लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.आनंद तेलतुंबडे यांनी १४एप्रिल रोजी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना २२एप्रिलपर्यंत कोठडीत राहण्याचे आदेश दिले होते.तेलतुंबडे यांची ज्या पोलीस अधिकाऱ्याने चौकशी केली होती त्यांची कोव्हिड-१९ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तेलतुंबडे यांना क्वांरटाईन करण्यात आलं होते.आता तेलतुंबडे यांच्या कोठडीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तेलतुंबडे यांच्यावर काय काय उपचार झाले याबाबतचा अहवाल १५ मे पर्यंत सादर करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.’

आता तेलतुंबडे यांच्या कोठडीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तेलतुंबडे यांच्यावर काय काय उपचार झाले याबाबतचा अहवाल १५ मे पर्यंत सादर करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

आनंद तेलतुंबडे कोण आहेत ?

आनंद तेलतुंबडे हे दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला.

त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

काही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातही अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.

त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे.

त्यांनी आयआयटी खरगपूरला अध्यापनही केलं असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत २६ पुस्तकं लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केले आहे.

तेलतुंबडेंवर नक्की कोणते आरोप ?

३१ डिसेंबर २०१७ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात काही विचारवंतांना, लेखकांना २८ ऑगस्ट २०१८ ला अटक करण्यात आली होती. हे अटकसत्र सुरू असताना आनंद तेलतुंबडे यांच्या घरावरही छापा मारण्यात आला होता.

आनंद तेलतुंबडेंच्या मते पोलिसांनी कोणतंही वॉरंट नसताना त्यांच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली. घराचे चित्रीकरण केलं आणि घर पुन्हा बंद केलं. तेव्हा तेलतुंबडे मुंबईत होते. हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांची पत्नी गोव्याला गेली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

३१ ऑगस्ट २०१८ला तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात पाच कार्यकर्त्यांसह आनंद तेलतुंबडे यांचाही भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग असल्याच्या समर्थनार्थ एक पत्र सादर केलं. ते पत्र कुणी ‘कॉम्रेड’ यांनी लिहिल्याचा पोलिसांनी उल्लेख केला.

“एप्रिल २०१८मध्ये पॅरिसमध्ये एक परिषद आयोजित केली होती. त्यात आनंद तेलतुंबडेंची मुलाखतही झाली होती. त्या परिषदेचा खर्च माओवाद्यांनी केला होता आणि मुलाखत घेण्याची व्यवस्थाही माओवाद्यांनी केली होती,” असा आरोप पोलिसांनी केला होता.

परिषदेच्या आयोजकांनी या आरोपांचा स्पष्ट शब्दात निषेध केला आहे, असं तेलतुंबडे यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *