मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज

राजकीय राज्य

मुंबई, दिनांक ११मे

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरेंनी थोड्याच वेळापूर्वी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *