महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅक डाऊन ची मुदत वाढवली

राज्य

मुंबई, दिनांक १७

महाराष्ट्रात आणखी १४ दिवस म्हणजे ३१ मेपर्यंत लोक डाऊन कायम राहणार आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील १४ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. याबाबतचा आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे.लाॅक डाउन वाढवण्याच्या आदेशावर राज्याच्या मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली आहे.

लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.

लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – २५ मार्च ते १४ एप्रिल (२१ दिवस)
दुसरा लॉकडाऊन – १५ एप्रिल ते ३ मे (१९ दिवस)
तिसरा लॉकडाऊन – ४ मे ते १७मे (१४ दिवस)
चौथा लॉकडाऊन – १८ मे ते ३१ मे (१४ दिवस)
देशात २५ मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. २१दिवसांचा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन १५ एप्रिल ते ३ मे असा होता. तिसरा लॉकडाऊन ३ मे रोजी सुरु होऊन १७ मेपर्यंत चालला. १७ मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

मुंबई आजही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे रेड झोनचा लॉकडाऊन लगेच उठेल असे दिसत नाही. ऑरेंज झोनमध्ये कंटन्टेंमेट झोन आहे. ग्रीनमध्ये ते नाहीत. ऑरेंजमधील कंटेन्टेंमेट झोन वगळून इतर ठिकाणी दुकान सुरु करता येतील. रजिस्ट्रेशन, गाड्यांची खरेदी विक्री सुरु होती. त्यानिमित्ताने सरकारला आर्थिक स्त्रोत सुरु होईल,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल 1१हजार ६०६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक ६७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज १हजार ६०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३० हजार ७०६वर पोहोचली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ४७९ वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत दिवसभरात ८८४ नवे रुग्ण आढळले आहे. तर ४१जणांचा मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *