लाॅकडाऊन ४‌ नियमावलीमुळे आयपीएल क्रिकेट आयोजनाचा मार्ग मोकळा

क्रीड़ा

मुंबई, दिनांक १८ मे

देशात लाॅकडाऊन ४ साठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला धोका रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत.भारत सरकारने ३१ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढवला आहे. यावेळी गृहमंत्रालयाने आपला आदेश शिथिल करुन नवीन मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले आहेत. यावेळी देशातील स्टेडियम उघडण्यास परवानगी देण्यात आली असून जिथे सामने आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, स्टेडियममध्ये फक्त खेळाडूंनाच परवानगी असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास बंदी आहे. त्यामुळे देशात क्रीडा पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जो कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मार्चपासून बंद झाला होता.

तथापि, गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या देशातील वैद्यकीय सेवा आणि घरगुती हवाई रुग्णवाहिकांचा अपवाद वगळता सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवा या महिन्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव शेवटपर्यंत बंद राहतील.
तथापि, गृह मंत्रालयाच्या नवीन नियमांमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल २०२० ची सुरुवात २९ मार्चपासून होणार होती पण कोरोना व्हायरसच्या साथीमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलचे आयोजन केले पाहिजे यावर अनेक खेळाडू आणि माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांची सहमती होती. टीव्हीवर याला प्रचंड चांगला टीआरपी मिळेल आणि क्रीडाप्रेमींचं देखील मनोरंजन होईल.
याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने कोरोना व्हायरसमुळे आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२० स्थगित केला जाऊ शकतो.असे मत व्यक्त केले होते. याबाबत टेलरने एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं होतं. ‘मला वाटते टी-२० वर्ल्ड कप २०२० स्थगित केला जाईल. कारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान १५ संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होतील.’ सात ठिकाणी प्रस्तावित ४५ सामने खेळविण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत प्रवास करणे खूप कठीण होईल आणि खर्चही खूप होईल. त्यामुळे आयसीसीने टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास त्यादरम्यान बीसीसीआयला भारतात आयपीएल त् आयोजित करण्याची संधी मिळेल.’
आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माईक हेसन यांनासुद्धा यंदा आयपीएलचे आयोजन करण्याची अपेक्षा होती. याबाबत ते असे म्हणाले की, ‘आम्हाला अजूनही आशा आहे की, यावर्षी आयपीएल होईल.’
लाॅकडाऊन ४ च्या
नियमावलीमुळे आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *