महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटील, सरपंच व उपसरपंच यांना विमा संरक्षण द्यावे; जि.प. सदस्य भोलेनाथ कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ

पुसद, (राजेश ढोले) दिनांक १८ मे

कोरोना विषाणू (कोविड-१९) या महामारीचे देशावर संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या शासनासह जे संबधीत घटक काम करीत आहेत .ते अभिनंदनीय आहे. ग्रामीण भागात तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील ,सरपंच, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर या कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून काम करीत राज्य शासनाने त्यांनाही विमा संरक्षण द्यावे अशी मागणी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य भोलेनाथ कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर ,आरोग्यसेवक, आरोग्यसेविका ,सफाई कामगार ,पोलीस ,बँक कर्मचारी , महसूल व पंचायत विभागाचे अधिकारी-कर्मचारी शिक्षक व इतर सर्व राबवत असलेली यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे.या शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना ज्याप्रकारे विमा संरक्षण दिले आहे. या प्रमाणेच तलाठी ,ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर्स, रेशन दुकानदार यांनाही विमा संरक्षण देणे आवश्यक आहे. हे सर्व घटक खेडेगावात कोरोना विषाणूचा ( कोविड-१९) प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून ग्रामस्थांचा बचाव होण्याकरिता गावासाठी राबत आहेत. तेव्हा त्यांचाही विमा काढणे गरजेचे आहे. यावर सरकारने सकारात्मक विचार करावा अशी मागणी यवतमाळ जिल्हा परिषदेतील काकडदाती सर्कलचे जि. प .सदस्य यवतमाळ भोलेनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाची प्रती त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड, यवतमाळ जिल्हाधिकारी व पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार इंद्रनिल नाईक यांच्याकडे पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *