नाम संघटनेतर्फे पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे मोफत वाटप

विदर्भ

पुसद, (राजेश ढोले) दिनांक १८ मे

महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक संकटात शेतकरी कष्टकरी श्रमजीवी व सामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाम फाउंडेशन या सामाजिक व सेवाभावी संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,उमरखेड व महागाव तालुक्यातील गरजू कुटुंबांना मोफत किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.कोरोना विषाणूमुळे आलेल्या जागतिक महामारी पासून बचाव करण्यासाठी शासनाने देशभरात लाॅकडाऊन सुरू केला आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत. अशा प्रसंगी नाम या सामाजिक व सेवाभावी संस्थेने पुसद उमरखेड व महागाव या तालुक्यातील गरजू कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किट मोफत वाटप केले आहे. तब्बल तीनशे कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूंमुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांचा रोजगार बुडत आहे. हाताला काम नाही व दुसर्‍यांना आपल्या अडचणी सांगता येत नाही. अश्या स्वाभिमानी, विधवा,दिव्यांग,
शेतमजूर व ज्यांच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही अशा तिनशे गरजू कुटुंबांचा ‘नाम’ चे समन्वयक स्वप्नील देशमुख व सहकार्यांनी शोध घेऊन आणि सुरक्षित अंतर राखून, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. विशेष म्हणजे लाभार्थी कुटुंबांना मदत करत असल्याचे कुठलेच फोटो न काढता प्रसिद्धी टाळली.
शासनाने गरजूंना गहू व तांदूळ दिले असले तरी ह्या अन्नधान्याला टाळून नाम संघटनेने सोयाबीन तेल २ लिटर, तूरडाळ २ की, चणाडाळ, बरबटी, चणे, साखर,मीठ प्रत्येकी १ की, मिरची पावडर अर्धा कीलो, चहा पावडर व हळद प्रत्येकी १०० ग्रॅम अशी अन्नकीट वाटप केले.
या किटचे वाटप होत असतांना पुसदचे तहसिलदार वैशाख वाहूरवाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई, सहाय्यक पो.नि. विजय रत्नपारखी, नायब तहसीलदार किशोर वानखेडे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
नाम सामाजिक संघटनेचे विदर्भ खानदेश प्रमुख हरीश इथापे, व पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्नील देशमुख यांच्या पुढाकाराने ही मदत देण्यात आली.
अन्नकीट वाटपासाठी धनंजय देशमुख, पवन देशमुख,संजय रेक्कावार, तात्यासाहेब नाईक, किरण देशमुख सवणेकर,व्यंकटेश चिद्दरवार, संजय वाकडे, प्रशांत देशमुख,शैलेंद्र देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *