सुधारित अपडेट:-जळगाव जिल्ह्यात आणखी २० कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या झाली ३१७

जळगाव

जळगाव दिनांक १९ मे

सुधारित माहिती:

जळगाव जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३१७ असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकूण ३२० रुग्ण असल्याची माहिती मिळाली होती.जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी २५ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ते२० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे ७, भुसावळ येथील ४, चोपडा येथील १, पळासखेडा तालुका जामनेर येथील १, यावल तालुक्यातील २, गांधी चौक सावदा तालुका रावेर येथील २तर जळगाव शहरातील पोलिस कॉलनी मधील २ व सिव्हील हॉस्पिटल मधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अमळनेर भुसावळ व जळगाव येथील प्रत्येकी
एक रुग्णाचा पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३१७ एवढी झाली असून आतापर्यंत एकशे दहा रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. तर ३७ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Leave a Reply