जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूची व्याप्ती वाढतेय; आणखी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रूग्ण संख्या झाली ३४६

जळगाव

जळगाव दिनांक २० मे

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यालासुद्धा ट विळखा घातला असून दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. आज जळगाव,पाचोरा, कासोदा, एरंडोल ,यावल,रावेर,भडगाव, शेंदुर्णी, पहुर आदि ठिकाणच्या कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने तपासणी अहवाल प्राप्त झालेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचे अवलोकन केले असता कोरोना संसर्गाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यासाठी ही ही धोक्याची घंटा असून केंद्र व राज्य शासनाने लॉक डाऊन करिता घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर येऊन पडली आहे. आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण 346 एवढे झाले आहेत. यापैकी 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 37 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आज आज कोरोना संशयित रुग्णांच्या ८८ स्वॅब नमुना चाचणी अहवालाची पहिली यादी प्राप्त झाली होती. त्यातील 75 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते तर तेरा व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल आले होते. यात भडगाव येथील आठ चोपडा व यावल येथील प्रत्येकी एक जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरासह तीन रुग्णांचापॉझिटिव्ह अहवाल आला होता. यामुळे कोरोना बाधितांची रुग्ण संख्या 331 वर पोचली होती.

त्यानंतर स्वॅब घेतलेल्या १३४ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल‌ प्राप्त झाले आहे. यापैकी ११९ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील तेरा, सावखेडा, ता. पाचोरा येथील एक व रावेर येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३४६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर आतापर्यंत ३८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *