हाय प्रोफाइल महिलांचा पार्टी का फंडा पोलिसांच्या कचाट्यात; एमआयडीसी पोलिसांनी केली ३३ महिलांवर कारवाई

जळगाव

जळगाव दिनांक २१मे

अवघे जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जळगाव शहरात मात्र केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊनला धाब्यावर बसवत शहरातील हायप्रोफाईल कुटुंबातील महिलांनी बुधवारी दिनांक २० मे रोजी एकत्र येत केलेला पार्टी का फंडा त्यांना चांगलाच महागात पडला आहे. मेहरुन तलाव परिसरात असलेल्या श्री श्री लेक रेसिडेन्सी‌‌ येथे सुरु असलेली किटी पार्टी या महिलांच्या चांगल्याच आली. पार्टी अंतरंगात येण्यापूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या हायप्रोफाईल कुटुंबातील महिलांचा उत्साह भंग पावला.

कोरोना महामारी चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने जळगाव जिल्हा रेडझोन मध्ये टाकला आहे. पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे यावरही बंदी असताना या महिलांनी पार्टीचा आनंद उत्सव साजरा करण्याचा मनसुबा त्यांना चांगलाच महागात पडला. एकीकडे कोरोना रोगाचा संसर्ग वाढत असताना त्यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण जग ठप्प पडले आहे. सुरक्षित अंतर हा कोरडा वरील चांगला मार्ग असल्याचे शासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत. दुकाने कारखाने विविध खाजगी अस्थापने बंद असल्याने अनेकांना रोजगाराची चिंता भेडसावत आहे. मात्र सामाजिक भान गमावून बसलेल्या हाय प्रोफाइल महिलांच्या मनोरंजनात्मक मानसिकतेचा प्रत्यय त्यांच्या किटी पार्टीमुळे आला आहे. नेरूळ तलावाजवळ श्री श्री लेक रेसिडेन्सी‌‌ परिसरात पार्टी करणाऱ्या तेहतीस महिलांची माहिती पोलिसांना मिळताच निर्भया पथकाच्या मंजू तिवारी यांना वायरलेस करून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी तातडीने बोलावून घेतले. यावेळी हेड कॉन्स्टेबल तुकाराम निंबाळकर, दीपक चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील इम्रान सय्यद यांना मदतीला तैनात करण्यात आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशाने शिरसोली रस्त्यावर असलेल्या श्री श्री लेक रेसिडेन्सी येथे पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी या महिलांनी तोंडावर मास्क न लावता तसेच सोशल डिस्टन्ससिंग कोणतेही पालन केले नसल्याचे दिसून आले. जेवणावळी अंताक्षरी आणि हाय प्रोफाईल आनंदोत्सव साजरा करण्याचा या महिलांचा उत्साह अचानक पोलीस आल्यामुळे मावळला.

उषा महेन्द्रप्रसाद जोशी, पुनम कमलेश कटारिया, अलका नागडा, दीप्ती अग्रवाल, श्रुती तलरेजा, ज्योती राका, ज्योती बोरा, ज्योती नेमाने, मनीषा अबोटी, मीना पगारिया, निता मेहता, निरुपमा मेहता,नंदा राजपूत, नमिता बजाज, निता कांकरिया, पूनम भावसार, प्राची मुथा, प्रीती अग्रवाल, संजना महाले, किरण झवर, सुनिता दमानी, सपना बेदमुथा, सुनिता डाकलिया, सुनंदा राका, श्रुती काबरा, सरला काबरा, सुनिता जैन, सारिका गिरासे, सपना चोरडिया, सुश्मिता श्रीवास्तव, श्रीकांता राठी, विजया मुररीया, भारती महाले या महिलांवर कोरोना चा संसर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आपात्कालीन परिस्थितीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीसी कलम १८८, २६ ९अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply