कॉंग्रेसच्या निर्यात योजनेतंर्गत राज्यातील २९ हजार कुटुंबियांना प्रत्येकी २०० रुपयांचे वाटप

राज्य

मुंबई ,दिनांक २१ मे

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला प्रतिमाह सहा हजार रुपये सहा महिन्यापर्यंत द्यावेत अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज न्याय योजनेचा प्रारंभ केला. यानिमित्ताने युवक काँग्रेसने राज्यभर महिन्याला ६ हजार यानुसार प्रति दिवसाचे २०० रुपये २९ हजार कुटूंबाना प्रतीकात्मक स्वरूपात देण्याची न्याय योजना राज्यात सुरू केली आहे.

मंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वाधिक जनता ही घरात अडकून पडली आहे. या आर्थिक अडचणीत गोरगरीबांना मदत करण्यासाठी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एखादी योजना राबवावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. पुढील सहा महिन्यांसाठी प्रत्येक कुटुंबाला ६ हजार रुपये द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.
युवक काँग्रेसकडून राज्यात ‘न्याय योजने’ची प्रतिकात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आज राज्यातल्या २९ हजार कुटुंबियांना २०० रुपये देण्याची प्रतिकात्मक योजना काँग्रेसने हाती आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना लाँच केली होती.

या अंतर्गत युवक काँग्रेस कडुन राज्यातील २९ हजार कुटुंबियांना प्रत्येकी २०० रुपये देण्यात येणार आहे. न्याय योजनेच्या महिन्याच्या ६ हजार रुपयांच्या योजनेचं प्रतिकात्मक वाटप आज युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

लॉक डाऊनलोड घरीच अडकून पडलेल्या गरीब कुटुंबीयांना प्रत्येक महिन्यात केंद्र सरकारने सहा हजार रुपये द्यावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील २९ हजार कुटुंबियांना युवक काँग्रेसकडून २०० रुपये देण्यात आले आहेत. महिन्याला ६ हजार म्हणजेच दिवसाला २०० रुपये अशी प्रतिकात्मक मदत युवक काँग्रेसने दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे रोजी ही मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *