कोरोना मयतांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

जळगाव

जळगाव ,दिनांक २२मे

जळगाव शहरात कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करा अशी मागणी माजी नगरसेवक सुनील माळी यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील स्मशानभूमी करुणा मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अत्यंसंस्कार केले जात आहेत. याच ठिकाणी अन्य कारणांनी मृत्यू पावलेले यांचेही अंत्यसंस्कार होत असल्याने कोरोनाचा संसर्ग इतरांना होण्याची भीती आहे. शहरात धोरणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शहरात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे हे सर्व लक्षात घेऊन कोणामुळे मयत झालेल्या व्यक्तींसाठी अन्य ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था करावी अशी मागणी आयुक्तांकडे माजी नगरसेवक सुनील माळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *