शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा दणका बसताच कराडी शिवारात ट्रॉन्सफॉर्मर बसला

जळगाव

पारोळा, दिनांक २२ मे

तालुक्यातील बोळे येथील तीन महिन्यापासून जळालेला ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्तीबाबत महावितरणकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अखेर शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेकडे तक्रार करून केली.

नविन डिपी बसताच आनंद व्यक्त करतांना शेतकरी

संघटनेने शेतकऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत महावितरणला जाब विचारताच खडबडून जागे झालेल्या महावितरण अठरा तासात जळालेल्या डीपीच्या जागेवर नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसवला. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांच्याकडे जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा डॉ.रूपाली पाटील यांनी कराडी शिवारातिल बोळे येथील तीन महिन्यापासून जळालेल्या डीपीमुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची कल्पना दिली. संघटनेचे नेते विठ्ठलराव पवार यांनी तातडीने हालचाली करून महावितरणला याठिकाणी नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसविण्यास भाग पाडले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *