परप्रांतीय कामगारांच्या प्रश्नावरून योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सडेतोड उत्तर

राज्य

मुंबई, दिनांक २५ मे

कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं वक्तव्य करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खास त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारच राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट व ट्विटर द्वारे दिला आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला त्याचा फटका बसला आहे. जवळजवळ दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असून उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने या स्थलांतरित कामगारांनी आपल्या घरची वाट पकडली आहे . याच दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील कामगार हवे असल्यास सरकारची परवानगी लागेल असे म्हटले आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानावर उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट व ट्वीट करत असे म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ यांनी जसे म्हटले आहे कामगारांसाठी परवानगी घ्यावी. तसेच आता यापुढे महाराष्ट्रात येताना येथील पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे . त्याचसोबत महाराष्ट्र सरकारने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कामगारांना राज्यात आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो असावेत. कामगारांची ओळखळ असली पाहिजे तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्याचा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा असे ही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *