लॉक डाऊन काळात ग्राहकांची लूट थांबवा -अखिल भारतीय ग्राहक संघटना

विदर्भ

पुसद |राजेश ढोले, दिनांक २६ मे

कोरोना अर्थात कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. त्याचा परिणाम भारतात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात असून भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन संचारबंदी लागू केल्यामुळे व्यापारी व दुकानदार यांनी सर्व अत्यावश्यक वस्तूचे भाव वाढवून विकत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड गरीब व तसेच सर्व ग्राहकांना सहन करावा लागतआहे. मोठे व्यापारी व दुकानदार संचारबंदी असल्याचे कारण सांगून छापील किंमत एमआरपी पेक्षा जास्त पैसे घेत आहे. जसे की पंधरा किलो तेलाचा पीपाची किंमत साधारण चौदाशे रुपये असताना तो पीपा सोळाशे रुपये पर्यंत विकत आहे.

तसेच अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूं जास्त किमतीने विकले जात असल्याचा ग्राहकांच्या तक्रारी आहेत.आधीच स्थलांतरित मजूर, बाहेर गावचे नागरिक हवालदिल झाले असून हाताला काम नाही व पैसे नाही त्यातच मोठे व्यापारी व दुकानदार ग्राहकाकडून किमतीपेक्षा पेक्षा जास्त पैसे घेऊन ग्राहकांची लूट सुरू आहे. लॉक डाऊन काढा वस्तूंची जादा भावाने विक्री करणाऱ्या व्यापारी दुकानदार यांचे विरुद्ध कारवाई करावी या मागणीचे निवेदन अखिल भारततीय ग्राहक संघटनेच्या पुसद शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे.या निवेदनावर मनीष दशरथकर लक्ष्मण कांबळे राजेश ढोले कैलास श्रावणे दिनेश खांडेकर प्रकाश खंडागळे बाबुलाल राठोड इत्यादीनी सह्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *